Saturday, 21 September 2024

शिक्षकाने घेतले सात विद्यार्थी दत्तक

 *शिक्षकाने फुलविले दत्तक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू*


*फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर)* - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद ता- फुलंब्री येथील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत अशा सात गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी दत्तक घेतलेले आहे.या दत्तक विद्यार्थ्यांना वर्षभर आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.आर्थिक दुरावस्थेमुळे हे विद्यार्थी शैक्षणिक साहित्य खरेदी करू शकत नाहीत त्यांना उज्वलकुमार म्हस्के वर्षभर वह्या,पेन,पेन्सिल,कंपास बॉक्स,कलर बॉक्स,ड्रॉइंग वही,ईतर पुस्तके,शैक्षणिक स्टेशनरी हे आवश्यक साहित्य पुरवितात.

                 या सात विद्यार्थ्यांना या वर्षीचे शैक्षणिक साहित्य वितरीत करण्याचा कार्यक्रम वाकोदच्या जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडक यांनी म्हस्के सरांच्या या सामाजिक बांधिलकी व दानशूरपणाचे कौतुक केले.यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव साळवे,सांडू शेळके,नितीन शेळके,मंगल पाटील,मंगला वेळे,संगीता वाढोनकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

              विद्यार्थी हिताच्या या उपक्रमाबद्दल फुलंब्री पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर मॅडम,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन साहेब,आळंद केंद्राचे केंद्र प्रमुख संजय भुमे सर यांनी उज्वलकुमार म्हस्के यांचे अभिनंदन केले आहे.



Thursday, 22 April 2021

व्यापक लसीकरण

"१८ वर्षा वरील लसीकरण:अभिनंदनीय निर्णय " 

१ मे २०२१ पासून १८ वर्षावरील सर्वांचा  कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,तो कोविड-१९ आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
         १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या या राष्ट्रव्यापी पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली.१ मार्च पासून दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली.या लसीकरणाला अधिक व्यापक करण्यासाठी आता १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.महाराष्ट्र सरकारने दहा दिवसांपूर्वीच अशी मागणी केली होती आणि केंद्र सरकारने या मागणीस मान्यता देऊन राज्याचा सन्मान केला आहे.
          ९३ लाख लोकसंख्येच्या इस्त्रायलने ८०% नागरिकांचे जलद लसीकरण करून कोरोना आटोक्यात आणल्याचे जाहीर केले आहे.लसीकरणातून कोरोना रोखता येतो हा इस्त्रायलने जगात अनुकरणीय संदेश दिला आहे.भारताने या दृष्टीने १८ वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करून देऊन या दृष्टीने व्यापक पाऊल उचलले आहे,हे अभिनंदनीय आहे.
@उज्वलकुमार भारतीय.
औरंगाबाद

Sunday, 21 August 2016

Hi

सिंधु की जीत के लिए उनके कोच पुलेला गोपीचंद को भी बधाई,जिन्होंने अकादमी खोलने के लिए अपना घर तक गिरवी रख दिया,वाकई ऐसी निष्ठ काबिल तारीफ है